Gun License Controversy: गुंडाच्या भावाला बंदूक परवाना दिला नाही, फ्लाईल क्लोज अन् कदम बचावले!

Gun License Controversy: गुंडाच्या भावाला बंदूक परवाना दिला नाही, फ्लाईल क्लोज अन् कदम बचावले!

| Updated on: Oct 11, 2025 | 10:47 AM

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंड निलेश गायवळच्या भावाला, सचिन गायवळला, शस्त्र परवाना मंजूर केल्याचा आरोप झाला. मात्र, पुणे पोलीस आयुक्तांनी परवाना दिलाच नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अजित पवार, रोहित पवार आणि रामदास कदम यांच्याकडून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ याला शस्त्र परवाना देण्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. मात्र, या प्रकरणात एक नवीन पैलू समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गायवळला अद्याप कोणताही बंदुकीचा परवाना देण्यात आलेला नाही.

योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी सुरुवातीला म्हटले होते की, एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या शिफारशीनुसार योगेश कदमांनी परवान्यावर सही केली होती. परंतु, पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती स्पष्ट केल्याने आणि परवाना जारी झाला नसल्याने, योगेश कदम यांचे मंत्रिपद वाचल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असून, शिफारस करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

Published on: Oct 11, 2025 10:47 AM