नो खैरे ओन्ली भूमरे… शिंदेंचं मतदारांना आवाहन, तर विरोधकांची फडणवीसांनी काढली औकात?

| Updated on: Apr 26, 2024 | 11:25 AM

नो खैरे ओन्ली भुमरे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यंनी जोरदार इशारा दिला. संदीपान भुमरे यांचा अर्ज दाखल करताना स्वतः एकनाथ शिंदे हजर होते. यावेळी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. या रॅली एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्रीही होते हजर, बघा स्पेशल रिपोर्ट

शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर यावेळी नो खैरे ओन्ली भुमरे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यंनी जोरदार इशारा दिला. संदीपान भुमरे यांचा अर्ज दाखल करताना स्वतः एकनाथ शिंदे हजर होते. यावेळी मोठी रॅली काढत शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. या रॅली एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री दादा भूसे हजर होते. शिंदेंचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा सामना थेट ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आहे. तर लक्षवेधी म्हणजे दीपान भुमरे यांच्या रॅलीत राज ठाकरेंचे ही पोस्टर झळकले. तर शिंदेंनी मतदारांना संदीपान भुमरे यांना मतदानाचं आवाहन करताना नो खैरे ओन्ली भुमरे….एकच मामा भुमरे मामा….अशी नारेबाजी केली. बधा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 26, 2024 11:25 AM