Sangli Double Murder: सांगली हादरली, बर्थ-डे पार्टीत काय घडलं? राजकीय नेत्याची मुळशी पॅटर्न स्टाईलनं हत्या
सांगलीत दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या पार्टीत निर्घृण हत्या करण्यात आली. मुळशी पॅटर्न स्टाईलने झालेल्या या हल्ल्यात एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शहरात सध्या तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सांगली शहरात मंगळवारी रात्री दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहिते यांची त्यांच्याच वाढदिवसाच्या पार्टीत निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या मुळशी पॅटर्न स्टाईलने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून चाकूने हल्ला केला. या घटनेत हल्ला करणाऱ्यांपैकी एक, रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त जमावाकडून बेदम मारहाण झाल्याने किंवा चाकू लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. उत्तम मोहिते यांच्यावर आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती आहे. गणेश मोरे आणि उत्तम मोहिते यांच्या गटातील वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर सांगलीत तणावाचे वातावरण असून, पोलीस तपास करत आहेत.
Published on: Nov 12, 2025 06:04 PM
