“रवी धंगेकर माझे मित्र”, संजय काकडे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? पाहा व्हिडीओ…

“रवी धंगेकर माझे मित्र”, संजय काकडे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jun 28, 2023 | 5:00 PM

भाजप नेते संजय काकडे यांनी कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी आमदार धंगेकरांना मोदी@9 पुस्तिका भेट दिली. शिवाय मोदी सरकारने 9 वर्षांच्या काळात राबविलेल्या योजनांची माहिती आमदार धंगेकराना देण्यात आली.

पुणे : भाजप नेते संजय काकडे यांनी कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी आमदार धंगेकरांना मोदी@9 पुस्तिका भेट दिली. शिवाय मोदी सरकारने 9 वर्षांच्या काळात राबविलेल्या योजनांची माहिती आमदार धंगेकराना देण्यात आली. मात्र आमदार रविंद्र धंगेकर आणि संजय काकडेंच्या भेटीची पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.कसबा पोटनिवडणूक रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात संजय काकडे यांनी जोरदार प्रचार केला होता. तरी धंगेकर यांचा कसब्यात मोठा विजय झाला.मात्र या भेटीनंतर आता 2024 मध्ये कसब्यात वेगळी राजकीय गणितं राहणार अशीच चर्चा सुरू झाली आहे. यावेळी संजय काकडे आणि रवींद्र धंगेकर काय म्हणाले, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jun 28, 2023 05:00 PM