Sanjay Raut LIVE | कर्नाटकप्रश्नी महाराष्ट्रातील भाजपचे नेते काय करतायत? संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut LIVE | कर्नाटकप्रश्नी महाराष्ट्रातील भाजपचे नेते काय करतायत? संजय राऊत यांचा सवाल

| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 10:52 AM

गेल्या दोन दिवसांपासून एकीकरण समितीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना बेकायदा अटक केलीय. त्यांना बेदम मारहाण केली जातीय, लाठीमार केली जातीय. यावर महाराष्ट्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज संघर्ष याचं प्रतिनिधीत्त्व गेल्या 70 वर्षांपासून करत आहे. त्यांनी साठी आंदोलन केलं आहे. समितीनं त्यासाठी रक्त सांडलं आहे, बलिदान दिलं आहे. बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरात त्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं या घटनेचा लोकशाही मार्गानं निषेध केला आहे. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला असेल तर त्यांच्यावर कायद्यानं कारवाई करावी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी जबरदस्ती करुन अटक केली आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून एकीकरण समितीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना बेकायदा अटक केलीय. त्यांना बेदम मारहाण केली जातीय, लाठीमार केली जातीय. यावर महाराष्ट्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. त्यांनी बंदी घालून दाखवावी, असं आव्हान थेट संजय राऊत यांनी दिलंय.