Sanjay Raut Video : ‘लाडक्या बहिणींमुळे 45 हजार कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की अदानीच्या खिशातून…’, राऊतांचा हल्लाबोल
लाडक्या बहीणीमुळे 45 हजार कोटींचा खड्डा आहे.', असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. तर लाडकी बहीण आणि कर्जमाफीसाठी मोदींच्या घरातून, अदानीच्या खिशातूनत किंवा गुजरातमधून पैसे आणा असे म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय.
‘निती आयोग आणि या देशाची शिखर बँक यांनी जी माहिती दिली आहे त्यात स्पष्ट दिसतंय. की निवडणुकीपूर्वी मतं मिळवण्यासाठी ज्या रेवडी योजना आहेत त्यामुळे महाराष्ट्र कर्जाच्या खाईमध्ये ढकलंलं गेलं आहे. लाडक्या बहीणीमुळे 45 हजार कोटींचा खड्डा आहे.’, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. तर लाडकी बहीण आणि कर्जमाफीसाठी मोदींच्या घरातून, अदानीच्या खिशातूनत किंवा गुजरातमधून पैसे आणा असे म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. ‘लाडक्या बहिणीमुळे 45 हजार कोटींचा खड्डा पडला आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे. भाजपने जाहीरनाम्यात कर्जमाफीचे वचन दिले आहे. आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसजी खोटं बोलू नका. एकनाथ शिंदे, औजत पवार यांची कर्जमाफी देण्याची भूमिका आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल’, असं राऊत म्हणाले. तर लाडक्या बहीणींना 2100 रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे. त्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरून की अदानीच्या खिशातून की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचे, असेही संजय राऊत म्हणाले.
