कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील : राऊत
कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut Denies Ashish Shelar Meeting)
कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत-शेलार यांच्या भेटीवर काल दिवसभर राज्यात चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलं. ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।’, असं सूचक विधान राऊत यांनी या ट्विटमधून केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. या ट्विटद्वारे राऊत यांनी शेलार यांच्यासोबत झालेल्या भेटीचं वृत्त नाकारलं आहे. या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काही लोक आपल्या नावाने अफवा पसरवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Denies Ashish Shelar Meeting)
