Sanjay Raut : प्रताप सरनाईक धोंडा! उद्धव ठाकरेंनीच त्यांना शेंदूर फासलाय, मंत्री होण्यासाठी त्यांनी… राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : प्रताप सरनाईक धोंडा! उद्धव ठाकरेंनीच त्यांना शेंदूर फासलाय, मंत्री होण्यासाठी त्यांनी… राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Sep 20, 2025 | 1:47 PM

संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी सरनाईक यांना एकनाथ शिंदे यांच्याशी जोडले असून त्यांच्या राजकीय वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रीपद मिळवण्यासाठी बेईमानी केली आहे. राऊत यांनी सरनाईक यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या शौर्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी राजन विचारे यांना शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संबोधले आहे आणि प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याविषयी बोलू नये असेही सुचवले आहे. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरेंनीच प्रताप सरनाईक यांना शेंदूर फासला असं म्हणत संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांचा उल्लेख धोंडा असा केला.

Published on: Sep 20, 2025 01:47 PM