Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंपासून सावध रहा, कारण… संजय राऊतांनी काय दिला सल्ला?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंपासून सावध रहा, कारण… संजय राऊतांनी काय दिला सल्ला?

| Updated on: May 05, 2025 | 11:00 AM

वरळीच्या जांबोरी मैदानात या सोहळ्याला कोणी फिरकलेच नाही. शरद पवार, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री या सोहळ्यात नव्हते. यासोबत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बहिष्कार टाकल्याचे राऊत म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांनी तसं उघडपणे बोलून दाखवलं. अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे. पण इतका तगडा गडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही. ते भाजपासोबत राहिले तर त्यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही’, असं सामना या वृत्तपत्रात म्हटले आहे. इतकंच नाहीतर अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. पण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या गौरव सोहळ्यावर बहिष्कार टाकला आणि त्यांनी आपल्या प्रतिनिधीला त्या सोहळ्यास पाठवले. कारण एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नाही हे स्वीकारायला त्यांचे मन तयार नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. यासंदर्भात पत्रकारांनी राऊतांना सवाल केला असता ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. ते ताजे ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. पण ते मानायला तयार नसून शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री मानतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यापासून सावध राहायला हवे’, असा खोचक सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

Published on: May 05, 2025 11:00 AM