Sanjay Raut On Ajit Pawar | अजितदादा उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच त्यांना तुरुंगात टाकणार होते; फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

Sanjay Raut On Ajit Pawar | अजितदादा उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच त्यांना तुरुंगात टाकणार होते; फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

| Updated on: Feb 24, 2026 | 12:21 PM

काल आयोजित केलेल्या शोकसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विषयी बोलताना, “महाराष्ट्राला न मिळालेला एक उत्तम मुख्यमंत्री आपण गमावला आहे,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. “ज्यांना आज उत्तम मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्यांनाच एकेकाळी तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू होती,” असा टोला राऊत यांनी लगावला. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, तर ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानेच झाले असते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Feb 24, 2026 12:21 PM