संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे…

संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे…

| Updated on: Nov 22, 2026 | 11:15 AM

संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत डीलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील राजकारण, टिपू सुलतान वाद, आणि पंतप्रधानांच्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी टीका केली. देशातील अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून महत्त्वाचे निर्णय पैशांच्या बळावर घेतले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, आगामी डीलिमिटेशन (पुनर्रचना) विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्यामागे हे विधेयक मंजूर करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांकडून आमदारांची खरेदी-विक्री झाली, त्याचप्रमाणे आता खासदारांना विकत घेतले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.

राऊत यांनी टिपू सुलतान वादावरही भाष्य केले. टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढलेला वीर आहे की देशाचा शत्रू, याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना, हे वाद उकरून काढले जात असल्याचा सूर त्यांनी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक वक्तव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याचे राऊत म्हणाले. गौतम अदानी आणि अंबानी यांनाच देशाची संपत्ती विकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Published on: Nov 22, 2026 11:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us