Sanjay Raut | फडणवीसांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut | फडणवीसांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, संजय राऊत यांचा टोला

| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 2:48 PM

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्यानं कोसळणार, असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केलंय.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्यानं कोसळणार, असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केलंय. लोकांचं प्रेम आणि नेत्यांची साथ यामुळे आपण अजूनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या याच वक्तव्यावरुन ‘अजुनी यौवनात मी’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

अजूनी यौवनात मी… असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजूनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार. त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पाहावीत. स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखांना ताकद यावी. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांव निशाणा साधलाय.