Sanjay Raut : म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही, राऊतांचा सुप्रिया सुळेंना टोला
Sanjay Raut Slams Supriya Sule : शरद पवारांची नवी पिढी भाजपसोबत जाण्यास व्याकुळ आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी यावर राष्ट्रवादीच्या नव्या पिढीला सल्ला दिला आहे.
तहान लागल्यानंतर कोणी गटारातल गढूळ पाणी पित नाही. सत्तेची तहान लागली असेल, कारण कारखाने, सूत गिरण्या आहेत. तहान लागली असली, तरी कोणत्या डबक्यात उडी मारायची. प्रत्येकाला आपलं स्थान शोधाव लागेल. जे गेलेत ते धडपडतायत, नवीन जाऊन काय करणार, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. शरद पवारांची नवीन पिढी भाजपासोबत जाण्यासाठी व्याकुळ आहे, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यावर त्यावर हे उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मला वाटत नाही तसं, सुप्रिया सुळेंच नाव तुम्ही वारंवार घेताय. अन्य काही नेत्यांच नाव घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली आहे. पण तहान लागल्यानंतर कोणी गटारातल गढूळ पाणी पित नाही.तहान लागली असली, तरी कोणत्या डबक्यात उडी मारायची हे समजायला हवं, असा सल्ला देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊत यांनी दिला आहे.
