चंद्रकांत पाटलांना बघाताच संजय राऊत म्हणाले; आपण तर एकत्र यायलाच पाहिजे, मी नेहमी लाईनच देतो..

चंद्रकांत पाटलांना बघाताच संजय राऊत म्हणाले; आपण तर एकत्र यायलाच पाहिजे, मी नेहमी लाईनच देतो..

| Updated on: Jul 13, 2024 | 11:52 AM

संजय राऊत विधानभवनाच्य पायऱ्यावरून उतरत होते त्याच वेळी समोरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आले. त्यांना पाहून राऊतांनी आपण एकत्र यायलाच पाहिजे, असं म्हणत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर एक पोजही दिली. त्यामुळे एकत्र नेमकं कशावरून यायचं यावरून दोन अर्थ निघतात.

विधानपरिषदेसाठी मतदान सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना आपण तर परत एकत्र यायला पाहिजे, असं भुवया उंचवणारं वक्तव्य केलं. त्यामुळे विधानसभेत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. राऊत विधानभवनाच्य पायऱ्यावरून उतरत होते त्याच वेळी समोरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आले. त्यांना पाहून राऊतांनी आपण एकत्र यायलाच पाहिजे, असं म्हणत माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर एक पोजही दिली. त्यामुळे एकत्र नेमकं कशावरून यायचं यावरून दोन अर्थ निघतात. एकतर नुसतं कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी हे वक्तव्य आहे. की जुन्या युतीच्या पॅचअपबद्दल संजय राऊत बोलत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय की, भाजप किंवा चंद्राकांत पाटील यांच्याशी कोणतंही वैयक्तिक भांडण नाही पण वैचारिक भांडण कायम राहिल म्हणत राजकीय मैत्री होणार नाही असं राऊत म्हणाले.

Published on: Jul 13, 2024 11:52 AM