Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बैठका घेणे ही कोणत्याही पक्षातील नियमित प्रक्रिया असते. मातोश्रीवर अशा बैठका सातत्याने होत असतात. आगामी पावसाळी अधिवेशन, निधीचे प्रश्न, तसेच विविध जिल्ह्यांतील स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे पक्षाच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत.
यावेळी राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही जोरदार प्रतिक्रिया दिली. “हा फुटणार, तो फुटणार अशा अफवा सातत्याने पसरवल्या जातात. ऑपरेशन टायगर करणार असल्याचा दावा करणाऱ्यांचेच ऑपरेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शंभर वेळा केले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, “हा गट सरळ मार्गाने निर्माण झालेला नाही. तो अमित शहांचा पक्ष आहे, शिवसेना नाही.” पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधींना फोडणे आणि राजकीय स्वार्थासाठी माणसे विकत घेणे ही सध्याच्या राजकारणातील विकृती असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.