Sanjay Raut Full Press | मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण; ऑपरेशन सिंदूर वरून संजय राऊतांची जहरी टीका चर्चेत….म्हणाले

| Updated on: May 07, 2026 | 1:29 PM

ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान अवघ्या चार दिवसांत पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र, संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे युद्ध थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मोदी यांच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण झाले,” अशी जहरी टीका करत राऊत यांनी भारताकडे मोठी संधी असतानाही सरकारने माघार घेतल्याचा आरोप केला. राऊत म्हणाले की, पाकिस्तानमध्ये घुसून मोठे नुकसान होत असतानाच युद्धविराम करण्यात आला आणि मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली आले. तसेच इराणकडून भारत सरकारने धडे घ्यायला हवेत, असा टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी कुंभमेळ्याच्या कामांवरूनही भाजपवर टीका केली. “कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांमधून गुजरातमधील किती ठेकेदारांना फायदा होणार, हे सरकारने सांगावे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, नाशिकमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

Published on: May 07, 2026 01:29 PM
Follow Us