Sanjay Raut | महाराष्ट्रात फिरणे… महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा

Sanjay Raut | महाराष्ट्रात फिरणे… महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा

| Updated on: Jan 17, 2026 | 11:20 AM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत सांगितले की, बाळासाहेबांच्या मुंबईत गौतम अदानीचा झेंडा फडकवत मराठी माणसासोबत गद्दारी केली गेली आहे. “मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही,” असे राऊतांनी स्पष्ट केले. मराठी माणूस चिडलाय आणि संतापलेला आहे.

महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत सांगितले की, बाळासाहेबांच्या मुंबईत गौतम अदानीचा झेंडा फडकवत मराठी माणसासोबत गद्दारी केली गेली आहे. “मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही,” असे राऊतांनी स्पष्ट केले. मराठी माणूस चिडलाय आणि संतापलेला आहे.

सत्ता, झुंडशाही आणि पैशाच्या ताकदीच्या विरोधात आम्ही सातत्याने संघर्ष केलाय, असेही राऊत म्हणाले. त्यांनी विरोधकांना इशारा देत म्हटले की, आज सत्तेत असाल, काही काळ राहू शकता, पण भविष्यात हे जयचंद, हे बाळाजी पंत नातू यांना महाराष्ट्रात आणि मुंबईत फिरणे मुश्किल होईल.

Published on: Jan 17, 2026 11:20 AM