Satara : नादखुळा… साताऱ्याच्या कराडमधील आजी 65 व्या वर्षी रस्त्यावर फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा, उतारवयात का घेतला निर्णय?
कराड मधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो मात्र असं असतानाही नांदगावच्या मंगल आबा आवळे या 65 वर्षीय आजी अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाला मनापासून सलाम...
वयाची पन्नाशी ओलांडली की लोक रिटायरमेंट घेतात घरी बसतात मात्र वयाच्या 65 व्या वर्षी आजीने नव्याने सुरुवात करून रिक्षा चालवून मुलाच्या संसारात भर लावायचा निर्णय घेतल्याचे दिसतंय व धाडसाने त्या रिक्षा चालवून स्वतःही आनंद घेत आहे. टू व्हीलर असो फोर व्हीलर ती चालवताना महिलांना कसरत करावी लागते. काही महिला सरावाने सराईतपणे वाहने चालवतात. तरीही मनात धाकधूक असतेच. मात्र कराड तालुक्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय आजी चक्क गर्दीतूनही सुपरफास्ट रिक्षा पळवत असल्याचे पाहायला मिळतंय. उतारवयात वेगवान रिक्षा चालवताना कसलीही भीती न बाळगता या आजी सराईतपणे रिक्षा चालवताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत. सध्या साताऱ्या जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदगाव येथील मंगल आबा आवळे या 65 वर्षीय आजीची चांगलीच चर्चा होतेय. दरम्यान, या आजीने आपल्या मुलाला हातभार लागावा यासाठी रिक्षा चालवत असल्याचे सांगितले.
मंगला आवळे यांचे पती मुले लहान असतानाच हे जग सोडून गेले तेव्हापासून त्या मोलमजुरी करून तीन मुली व एका मुलगा असा चार मुलांचा सांभाळ करत होत्या. मुलगा मोठा होऊन एसटीमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मुलींची लग्न झाली असून मुलाचाही संसार चौकोनी झाला आहे. त्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा स्वतःच्या औषध पाण्याचा खर्च निघावा या उद्देशाने सुरुवातीपासूनच कष्टात आयुष्य घालवलेल्या मंगला आवळे या आजीने मुलाकडून रिक्षा शिकून घेऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. वय 65 वर्ष व शुगरचा त्रास असणाऱ्या या आजीने पंधरा दिवसापासून रिक्षा हातात घेतली आणि पंधरा दिवसातच त्या गर्दीतूनही रिक्षा चालवू लागल्या आहेत. त्यांच्या मुलाने त्यांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लागावा तसेच आपली आवड ही जोपासता यावी यासाठी या आजीने हे धाडस केलं आहे.
