कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
साताऱ्यातील कराड तालुक्यातील पाचूपते वाडी येथे पुणे डीआरआय विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका अंमली पदार्थ निर्मिती कारखान्यावर हा छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या कारवाईबाबत स्थानिक सातारा आणि कराड पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
साताऱ्यातील कराड तालुक्यात, पाचूपते वाडी येथे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुणे डीआरआय विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, परिसरात एका अंमली पदार्थ निर्मिती कारखान्यावर छापा टाकल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयने केलेल्या या महत्त्वपूर्ण कारवाईबाबत स्थानिक सातारा पोलीस आणि कराड पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. स्थानिक पोलीस या कारवाईबाबत अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त केल्याचे बोलले जात आहे. डीआरआयच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
Published on: Jan 25, 2026 03:56 PM
