Phaltan Doctor Death : मृत डॉक्टरच्या तळ हातावर बनकरचं नाव अन्… पोलिसांना आणखी तीन दिवसांचा वेळ, आणखी कसून चौकशी होणार

Phaltan Doctor Death : मृत डॉक्टरच्या तळ हातावर बनकरचं नाव अन्… पोलिसांना आणखी तीन दिवसांचा वेळ, आणखी कसून चौकशी होणार

| Updated on: Oct 28, 2025 | 5:57 PM

फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर महिलेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरच्या नावाचा उल्लेख होता.

फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी प्रशांत बनकरला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यासाठी संशयित आरोपी प्रशांत बनकरची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संशयित आरोपी प्रशांत बनकरची आणखी कसून पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साताऱ्यातील फटलण येथील डॉक्टर महिलेनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळ हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकरच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Published on: Oct 28, 2025 05:57 PM