Phaltan Doctor Death : बनकरच्या घरात डॉक्टर महिला राहत होती, त्यांचं लग्न…  बदनेवरील आरोप मोघम, वकिलांचा दावा काय?

Phaltan Doctor Death : बनकरच्या घरात डॉक्टर महिला राहत होती, त्यांचं लग्न… बदनेवरील आरोप मोघम, वकिलांचा दावा काय?

| Updated on: Oct 27, 2025 | 1:14 PM

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदनेवरील अत्याचाराचे आरोप मोघम असून, त्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. तर सरकारी वकिलांनी गुन्हे गंभीर असल्याने मोबाईल जप्तीसाठी सात दिवसांची कोठडी मागितली होती.

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत डॉक्टर तरुणीने बदनेवर अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. आरोपी गोपाल बदनेच्या वतीने युक्तिवाद करताना राहुल धायगुडे यांनी बदनेचा कोणताही दोष नसून, त्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले.

याउलट, सरकारी वकिलांनी हा अत्यंत गंभीर गुन्हा असून, महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारी घटना असल्याचे नमूद केले. मोबाईल जप्त करण्यासाठी आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आरोपीची सात दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. आरोपीच्या वकिलांनी पीडित महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात लग्नावरून वाद सुरू होते, तसेच ती प्रशांत बनकरच्या घरी राहत होती असाही दावा केला. युक्तिवादानंतर न्यायालयाने गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Published on: Oct 27, 2025 01:14 PM