Nagpur रेल्वे स्थानकात जिवंत स्फोटकाची बॅग ठेवणाऱ्याचा शोध सुरु
गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात (Nagpur Railway Station) काल (सोमवारी) रात्री जिवंत स्फोटकांची बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.
नागपूर : गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात (Nagpur Railway Station) काल (सोमवारी) रात्री जिवंत स्फोटकांची बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध सुरु आहे. तपास यंत्रणांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. जिलेटिनच्या 54 कांड्या (gelatin sticks and detonators) असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू (Bomb Scare) आढळली होती. या रंगाची बॅग कोणाच्या हातात होती, हे सीसीटीव्हीच्या आधारे शोधले जात आहे. जिवंत स्फोटकांची बॅग वेळीच सापडल्याने मोठा अनर्थ टळला.
Published on: May 10, 2022 10:40 AM
