35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनची तार जोडली

| Updated on: Jul 21, 2021 | 10:08 AM

त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Follow us on

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेल्याने साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका वायरमॅनने जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन पोलवरील तुटलेली हायटेन्शनची तार जोडली. त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.