Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको….
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी (मविआ) कडून करण्यात येत असून संजय राऊत यांनीही यासंदर्भात विधान केलं आहे. या आरोपांवर आता महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावत पुरावा सादर करण्याचं आव्हान दिलं आहे. “पुरावा द्या, हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही,” असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांची मतं तसेच नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील स्थानिक आघाड्या यांचा विचार केल्यास महायुतीची स्थिती मजबूत आहे. “या सगळ्याची बेरीज पाहिली तर मविआचा टिकाव लागू शकत नाही. अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची निवडणूक होणार,” असं देसाई यांनी स्पष्ट केलं. “महायुतीला जागा दाखवणार अशी मोठमोठी वक्तव्य करायची, मोठमोठे आकडे मांडायचे; पण त्यात काही तथ्य नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
नाशिकमधील उमेदवारी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, गोकुळ गीतेंनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. मात्र दोन गीते बंधूंपैकी गणेश गीतेंनी उमेदवारी मागे घेतली आहे. या प्रकरणावर शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीष महाजन यांच्यात चर्चा सुरू असून बैठकांद्वारे तोडगा निघण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बाळा माने यांनी विनायक राऊत यांच्यावर केलेल्या “रिचार्ज करून घेतात” या आरोपावरही देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात त्यांनी सांगितलं की, बाळा माने यांनी आधी उबाठाकडून उमेदवारी अर्ज भरला होता.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बाळ माने यांच्याबाबत संजय राऊत यांनी पूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याचं देसाई म्हणाले. त्यांनी पुढे असा आरोप केला की, उबाठामध्ये अनेक जण आतून एकनाथ शिंदे यांना मानतात, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते सध्या त्या गटात असल्याचं सांगतात. “बाळ माने यांनी बोललं म्हणून बरं झालं, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत घडामोडी बाहेर आल्या,” असं देसाई यांनी नमूद केलं. उबाठातील घडामोडींवरून महाराष्ट्रातील जनतेला वास्तव समजेल, असंही त्यांनी शेवटी म्हटलं.