Shambhuraj Desai | धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय महानगरपालिकेची सत्ता स्थापन होणं अशक्य; शंभूराज देसाई यांनी ठणकावले

Shambhuraj Desai | धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय महानगरपालिकेची सत्ता स्थापन होणं अशक्य; शंभूराज देसाई यांनी ठणकावले

| Updated on: Jan 04, 2026 | 4:50 PM

धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय कोणालाही महानगरपालिकेची सत्ता स्थापन करता येणार नाही, एवढे शिवसेनेचे नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहेत, असं देखील देसाई प्रचार सभेत म्हणाले. आ

सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराचा जोर प्रचंड वाढला आहे. आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. आम्हाला सत्तेत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. महाराष्ट्रातील महायुतीचे जे चित्र आहे ते एकनाथ शिंदेंमुळे आहे, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलंय. धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय कोणालाही महानगरपालिकेची सत्ता स्थापन करता येणार नाही, एवढे शिवसेनेचे नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहेत, असं देखील देसाई प्रचार सभेत म्हणाले. आज महाराष्ट्रात जे चित्र आहे, दोनशे पस्तीस पेक्षा जास्त जागांचं संख्याबळ ते फक्त मुख्यमंत्री असताना शिंदेंनी केलेले काम आणि घेतलेल्या निर्णयामुळे आहे. असंही त्यांनी सांगितलं.

Published on: Jan 04, 2026 04:50 PM