Sharad Pawar : काही चुकीचं नाही तर सरकारनं… ठाकरे बंधूंच्या हिंदी सक्तीविरोधी भूमिकेला पवारांचा पाठिंबा
ठाकरे बंधूंच्या हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिकेला शरद पवार यांनी सुद्धा पाठिंबा असल्याचं म्हटलेलं आहे. बघा काय म्हणाले शरद पवार?
हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 29 जून आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ठाकरे बंधूंच्या हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिकेला शरद पवारांचाही पाठिंबा पाहायला मिळालाय. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंची भूमिका चुकीची नाही, असं शरद पवार म्हणालेत. तर सरकारने हट्ट सोडावा मातृभाषाच महत्त्वाची आहे असं शरद पवार म्हणाले. ठाकरे बंधू त्यांचे मी स्टेटमेंट बघितलं. ते काही चुकीचं नाही त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्याही स्थितीत हिंदी सक्ती व्हायला नको या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्रातील मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तिथे मातृभाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणालेत.
