Election Manipulation : सलीम-जावेदची स्टोरी… पवारांनंतर ठाकरेंनाही ‘ती’ गॅरंटी देणारे लोक भेटले? राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले…
१६० जागा जिंकून देण्यासाठी विधानसभेच्या आधी काही लोक भेटले होते असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता आणि पवारांच्या याच गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांनी सुद्धा असाच दावा केलाय. निवडणुकीच्या काळात ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले होते असं संजय राऊत म्हणालेत
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार म्हणाले विधानसभे आधी दोन लोक भेटले १६० जागा जिंकण्याची गॅरंटीही दिली. तर संजय राऊत म्हणाले ठाकरेंनाही लोक भेटले. ६० ते ७५ जागा जिंकण्याची हमी दिली. विधानसभा निवडणुकी आधी दिल्लीत दोन जणांनी आपली भेट घेतली होती आणि त्या दोन जणांनी १६० जागा जिंकण्याची हमी दिली होती, असा दावा पवारांनी केला होता. आता संजय राऊतांनी सुद्धा तसाच दावा केलाय. शरद पवार आणि संजय राऊतांच्या या दाव्यांवर फडणवीसांनी मात्र टोला लगावलाय. तुमच्याकडे लोक आले होते तर त्यावेळी तक्रार का केली नाही असा सवाल फडणवीसांनी विचारलाय. शरद पवार आणि संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर आंबादास दानवेनी सुद्धा मोठा दावा केलाय. विधानसभेला अनेक उमेदवारांकडे ईव्हीएम मॅनेज करून देण्यासाठी लोक फिरत होते असं दानवे म्हणाले. तर पवार आणि राऊतांकडे आलेले लोक मांत्रिक असावेत असाही संशय अनिल बोन्डेनी व्यक्त केलाय.
