“मी पुन्हा येईन म्हणणारे येऊ शकले नाहीत म्हणून अस्वस्थ”; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

“मी पुन्हा येईन म्हणणारे येऊ शकले नाहीत म्हणून अस्वस्थ”; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 1:41 PM

कुठल्याही मैदानावर, कुठल्याही खेळाडूसमोर चौफेर फटकेबाजी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar). होय, कारण आता राजकारणाचे क्षेत्र मैदानच झालंय. त्यात त्यांनी पुन्हा एकदा सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सुनावायची संधी सोडली नाही.

कुठल्याही मैदानावर, कुठल्याही खेळाडूसमोर चौफेर फटकेबाजी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar). होय, कारण आता राजकारणाचे क्षेत्र मैदानच झालंय. त्यात त्यांनी पुन्हा एकदा सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सुनावायची संधी सोडली नाही. पवार खास आपल्या शैलीत म्हणाले, हल्ली काही लोक फार अवस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार, येणार…या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही. त्यामुळे ही अवस्थता असते, पण अपेक्षा करुया. आमच्या या स्नेह्यांना सुद्धा या परिस्थितीत काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लाभेल, असं आवाहन करून त्यांनी भाजपला (BJP) एक चिमटाही काढला. यावेळी पवार साऱ्या प्रश्नावरही बोलले.

Published on: Apr 25, 2022 01:41 PM