Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, शीतल तेजवानीला बेड्या, मोठा खुलासा होणार?

Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, शीतल तेजवानीला बेड्या, मोठा खुलासा होणार?

| Updated on: Dec 03, 2025 | 5:44 PM

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तेजवानीला अटक केली असून, शासकीय जमीन बेकायदेशीरपणे खासगी कंपनीच्या नावावर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या कोरेगाव पार्कमधील जमिनीबाबत हा गैरव्यवहार झाला आहे. शीतल तेजवानीच्या नावावर पॉवर ऑफ ॲटर्नी होती. या अधिकाराचा वापर करून तिने शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या नावावर केली, असा पोलिसांचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तेजवानीला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तिने मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत. तपासात तेजवानीने शासनाची फसवणूक केल्याचे आणि खोटी कागदपत्रे वापरून जमिनीची खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Published on: Dec 03, 2025 05:44 PM