मंत्रिमंडळ असणार पण कमीत कमी
हा शपथ विधी दोन टप्प्यात होणार असल्याने सरकार कधी अस्तित्वात येणार असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाले तरी इतर मंत्र्यांचा शपथ विधी झाल्या नसल्याने अजून सरकार जाग्यावर नाही अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळेच भाजपकडून आता कमीत कमी मंत्र्यांच्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या हालचाली वाढले असल्याचे दिसत आहे. 19 तारखेला चार ते पाच जणांचा शपथ विधी होणार असून त्यामध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाकडून चार जणांचा शपथ विधी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कमीत कमी मंत्री असल्याचेही बोलले जात आहे. हा शपथ विधी दोन टप्प्यात होणार असल्याने सरकार कधी अस्तित्वात येणार असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
Published on: Jul 14, 2022 08:25 PM
