shiv sangram Vinayak mete passed away: “खूप दुर्दैवी बातमी” म्हणत अमोल कोल्हेंनी सांगितल्या जुन्या आठवणी

| Updated on: Aug 14, 2022 | 9:21 AM

विनायक मेटे म्हणजे मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस (Pune Mumbai Highway) हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. […]

Follow us on

विनायक मेटे म्हणजे मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस (Pune Mumbai Highway) हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये. दरम्यान “मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं काम विनायक मेटेंनी केलं होतं. मेळावा घेतला होता तेव्हा मी मेटे साहेबांच्या संपर्कात आलो होतो तेव्हापासून मी पाहत आलोय मराठा समाजासाठी अत्यंत आग्रही भूमिका घेऊन ते रान पेटवण्याचं काम करत होते.” अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe On Vinayak Mete) यांनी व्यक्त केलीये.