Eknath Shinde : आपके नाम से हर शख्स… शिंदेंचा ‘तो’ एक शेर अन् शाहांच्या टाळ्या, जय गुजरातही म्हणाले
पुण्यातील कोंढवा येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचं भरभरुन कौतुक केलं. इतकंच नाहीतर जय गुजरातची घोषणा ही दिली
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चक्क जय गुजरातची घोषणा करण्यात आली. पुण्यातील कोंढवा भागात गुजराती समाजाकडून जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या समोरच जय हिंद, जय महाराष्ट्र जय गुजरात असा नारा दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना चांगलंच उधाण आलं असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासमोर एक शेर ऐकविला. ”आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है”, असं म्हणत शिंदेंनी धन्यवाद दिले अन् शाहांनी टाळ्या वाजवल्यात.
Published on: Jul 04, 2025 04:42 PM
