Uday Samant : मंत्री उदय सामंत तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय? कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

Uday Samant : मंत्री उदय सामंत तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, नेमकं कारण काय? कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

| Updated on: Aug 23, 2025 | 12:22 PM

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत हे तडकाफडकी शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्यांच्या भेटीचं कारण समोर आलंय.

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र या भेटीनंतर उदय सामंत यांनी या भेटीत नेमकं काय झालं याची माहिती दिली. ‘अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार हे आहे. त्याच संदर्भात आज बैठकीचं आयोजन होतं. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मी देखील आहे. या कमिटीचे कोषाध्यक्ष विश्वस्त, मी आणि आम्ही सगळे शरद पवार यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक येथील बैठकीसाठी उपस्थित होतो’, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत यांनी पुढे असेही म्हटले की, जिल्ह्यातील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत त्यांच्या उनत्तीसाठी, संघटनेसाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याचे शरद पवार यांच्या मनात आहे.  दरम्यान, 11 सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विश्वस्तांची एक बैठक आयोजित केली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याचा मी एक भाग आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या बैठकीला बोलवलं आणि यामध्ये कुठलीही राजकीय बाब आणि राजकारण नव्हतं, असं स्पष्ट प्रतिक्रिया उदय सामंत यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर दिली.

Published on: Aug 23, 2025 12:21 PM