...अन्यथा पळता भुई थोडी होईल, Manisha Kayande यांचा इशारा

…अन्यथा पळता भुई थोडी होईल, Manisha Kayande यांचा इशारा

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 7:52 PM

कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला आहे. तसेच आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे यांनी म्हटलं आहे.

मुंबई: हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार  (ashish shelar) यांनी केला होता. शेलार यांच्या या विधानाचा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी समाचार घेतला आहे. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशाराच मनिषा कायंदे यांनी दिला आहे. कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला आहे. तसेच आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे यांनी म्हटलं आहे. शेलार यांची टीका आणि कायंदे यांचं त्यावरच प्रत्युत्तर यामुळे हिंदू सणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आगामी काळात आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.