Special Report | अनिल परबांविरोधात रामदास कदमांनी सोमय्यांना पुरावे दिले? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

Special Report | अनिल परबांविरोधात रामदास कदमांनी सोमय्यांना पुरावे दिले? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 9:21 PM

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. पण टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.