Shivsena : शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेनं दाखवला ठाकरेंचा ‘तो’ जुना VIDEO, आप आगे चलो हम…

Shivsena : शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेनं दाखवला ठाकरेंचा ‘तो’ जुना VIDEO, आप आगे चलो हम…

| Updated on: Jul 04, 2025 | 6:02 PM

पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर जय गुजरातचा नारा दिला.

पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जय गुतरात असा नारा दिला. यानंतर विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अशातच विरोधकांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट लाव रे तो व्हिडीओ अॅक्शन घेतली. उद्धव ठाकरेंनीही जय गुजरातचा नारा दिला असं या व्हिडीओत दिसतंय.

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातमधील गांधीनगरमध्ये हजेरी लावली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणाचा शेवटच उद्धव ठाकरेंनी जय हिंद जय महाराष्ट्र असा केला. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जय गुजरातचा नारा दिला होता. उद्धव ठाकरे भाषणाच्या शेवटी आप आगे चलो हम साथ है. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असं म्हणाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

Published on: Jul 04, 2025 06:01 PM