Aaditya Thackeray : मनसेच्या मोर्चात सहभागी होणार का? सवाल करताच आदित्य ठाकरे म्हणाले, आमचा मोर्चा ठरलेला…
आमच्यामध्ये वेगळं काही नाही, आज कृती समिती भेटून गेली आहे. आम्ही आमचा मोर्चा ठरवला आहे सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं महत्त्वाचं आहे. जिकडे जिकडे ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडे लढावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेकडून 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे, तर 29 जून आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या प्रस्तावात असं म्हटलं की, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन आंदोलनं न करता एकच मोर्चा निघालाय हवा, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांना सवाल केला असता, ते म्हणाले, ‘आम्ही आमचा मोर्चा ठरवलेला आहे. मराठी कृती समिती आहे त्यांच्याकडून हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी त्यांनी आंदोलन घेतलं आहे. या विषयावर ज्यांना ज्यांना लढणं आणि एकत्र येणं गरजेचं आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
