Anil Parab : माजलेला आमदार… संजय गायकवाडांच्या गुंडगिरीवरून परबांचं चॅलेंज; हिंमत असेल तर…

Anil Parab : माजलेला आमदार… संजय गायकवाडांच्या गुंडगिरीवरून परबांचं चॅलेंज; हिंमत असेल तर…

| Updated on: Jul 09, 2025 | 2:44 PM

मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याच्या कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेतील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. त्या जेवणातील डाळीची दुर्गंधी आणि खराब भात असल्याचे सांगत त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बिल काऊंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दरम्यान, संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परब यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत यावर सवाल उपस्थित केलाय.

सरकारचा अशा आमदारांवर वचक आहे की नाही? असा सवाल अनिल परबांनी करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली. ते म्हणाले, ज्याला असं वाटतंय की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे. आपली प्रतिमा लोकांच्या मनात सुसंस्कृत म्हणून आहे. त्या प्रतिमेला असे आमदार तडा निर्माण करत आहेत. संजय गायकवाड यांच्या कृतीवर संताप व्यक्त करत परब असेही म्हणाले, तुमच्यात एवढी हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारा, असं म्हणत परबांनी थेट आव्हानच दिलंय.

Published on: Jul 09, 2025 02:44 PM