लोकसभेपूर्वी शिंदेंकडून मोठी ऑफर तर भाजपकडून थेट… ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

लोकसभेपूर्वी शिंदेंकडून मोठी ऑफर तर भाजपकडून थेट… ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

| Updated on: Jan 28, 2025 | 3:44 PM

गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा दारूण पराभव झाला होता. मात्र याच लोकसभेपूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून आणि भाजपकडून मोठी ऑफर आल्याचा दावा खैरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने मोठी ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा दारूण पराभव झाला होता. मात्र याच लोकसभेपूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून आणि भाजपकडून मोठी ऑफर आल्याचा दावा खैरेंनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती, शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करू…असं म्हणत संजय शिरसाट यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. तर भाजकापडूनही आपल्याला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा चंद्रकांत खैरै यांनी केला. हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे म्हणत राज्यपाल पदाची आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असंही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी म्हटलं.

Published on: Jan 28, 2025 03:44 PM