Shivsena UBT : हातात हात ओठांवर हसू… ठाकरेंच्या सेनेकडून राज-उद्धव यांचा मातोश्रीजवळचा ‘तो’ फोटो ट्वीट

Shivsena UBT : हातात हात ओठांवर हसू… ठाकरेंच्या सेनेकडून राज-उद्धव यांचा मातोश्रीजवळचा ‘तो’ फोटो ट्वीट

| Updated on: Apr 19, 2025 | 5:39 PM

राज ठाकरे यांनी आमच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्याचाच जुना फोटो ठाकरे गटाने ट्ववीटवर शेअर करत मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे, असं म्हटलंय

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती होऊ शकते, असं म्हणताना आमच्यातील भांडणं फार छोटी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हटले. दरम्यान, या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील यावर सकारात्मक भूमिका घेत माझी कुणाशी भांडणं नव्हतीच पण ती छोटी-मोठी भांडणं मिटवायला मिही तयार आहे. मराहाराष्ट्राच्या हितासाठी ही भांडणं बाजूला ठेवायला मी तयार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर ठाकरे गट शिवसेनेच्या ट्वीटर हँडलवरून एक जुना फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसत असून त्यांनी स्मित हास्य करत एकमेकांना हस्तांदलोन केल्याचे दिसतायत. त्यांच्यासोबत इतरही काही नेतेमंडळी दिसत आहेत. याच फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

असं आहे ट्वीट?

Published on: Apr 19, 2025 05:39 PM