Uday Samant : … म्हणून शिंदे दिल्लीला गेले असावेत, उपमुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली वारीचं ‘राज’ शिवसेनेच्या बड्या मंत्र्यानं सांगितलं
महाराष्ट्रातील राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने चर्चांना उधाण आलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेंच्या या दिल्ली वारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. मात्र शिंदेंची दिल्ली वारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटी मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर शिंदेंच्या दिल्ली वारीला विशेष महत्त्व प्राप्त झालंचं बोललं जात आहे. इतकंच काय तर त्यांनी आपले पूर्वनियोजित कार्यक्रम देखील पुढे ढकलले आहेत. अशातच शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंच्या दिल्लीवारीवर भाष्य केलंय. ‘दिल्लीला शिंदेंनी कोणासोबत भेट घेतली काही माहिती नाही पूर्ण दिवस सभागृहात होतो. पण महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील‘, असं सामंत म्हणाले.
Published on: Jul 10, 2025 05:41 PM
