कोणात्या तोंडाने लोकांकडे मत मागायची? शहाजी बापू पाटलांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

| Updated on: Jul 26, 2022 | 5:29 PM

"आजारपणाचा विषय नाही. मला यातलं जास्त कळत नाही. मी लहान माणूस आहे. तुम्ही आजारी होता, असा तुमचा आता दावा आहे. आजारपणात तुम्ही शिंदेसाहेबांकडे जबाबदारी द्यायला पाहिजे होती"

Follow us on

मुंबई: “आजारपणाचा विषय नाही. मला यातलं जास्त कळत नाही. मी लहान माणूस आहे. तुम्ही आजारी होता, असा तुमचा आता दावा आहे. आजारपणात तुम्ही शिंदेसाहेबांकडे जबाबदारी द्यायला पाहिजे होती. आमची काम मार्गी लागली असती. आम्ही तुमच्याकडे पत्र दिली. एकाही पत्राला उत्तर नाही. निवडणुका तोंडावर आल्या, नगर पालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत कोणात्या तोंडाने लोकांकडे मत मागायची?. आम्ही मत घेतांना लोकांना बोललो होतो, तुमच्या गावाला हे देईन, ते देईन. उद्या लोक मत कशी देणार? ही आमची अडचण होती” असं शहाजी बापू पाटील म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेला शहाजी बापू पाटील यांनी उत्तर दिलं.