Suhas Kande | भुजबळांनी नियोजन निधी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचं काम केलं, सुहास कांदे यांचा घणाघात

Suhas Kande | भुजबळांनी नियोजन निधी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालायचं काम केलं, सुहास कांदे यांचा घणाघात

| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 8:49 PM

जबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले.

नाशिक: भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाला करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली. त्यामुळे कांदे-भुजबळ वाद आणखी विकोपाला जाणार असल्याचं सांगितलं आहे. सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले.