Saamna Editorial | विरोधकांच्या दौऱ्यांना ‘पर्यटना’ची उपमा, सामनातून टीका

| Updated on: Jul 27, 2021 | 8:51 AM

बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेवर टीका करण्यात आली आहे. 

Follow us on

महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे आणि ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल. बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेवर टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल. बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न. केवळ पाहायला आलो नाही, तर सर्वतोपरी मदतही देणार, असे विरोधी पक्ष सांगतोय. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱया विरोधी पक्षाविषयी आणखी काय बोलावे! केंद्राकडून काय आणायचे ते आणा; स्वागतच आहे, असे शिवसेनेनं यात म्हटलं आहे.