Sudhakar Badgujar : ठाकरे सेनेच्या पत्रकार परिषदेतच राऊतांचा फोन अन् बडगुजरांची हकालपट्टी

Sudhakar Badgujar : ठाकरे सेनेच्या पत्रकार परिषदेतच राऊतांचा फोन अन् बडगुजरांची हकालपट्टी

| Updated on: Jun 04, 2025 | 1:16 PM

संजय राऊत यांचे राईट हँड समजले जाणाऱ्या सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते आणि संजय राऊत यांचे राईट हँड समजले जाणाऱ्या सुधाकर बडगुजर यांची आता ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता. पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होते. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना या पत्रकार परिषदेतच संजय राऊत यांचा नाशिकचे फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.

Published on: Jun 04, 2025 01:15 PM