Bhaskar Jadhav : …तेव्हाच उदय सामंत अन् फडणवीस यांची गट्टी जमली, शिंदेंची बाजू सावरण्याचा आव… ठाकरेंच्या नेत्यानं डिवचलं

Bhaskar Jadhav : …तेव्हाच उदय सामंत अन् फडणवीस यांची गट्टी जमली, शिंदेंची बाजू सावरण्याचा आव… ठाकरेंच्या नेत्यानं डिवचलं

| Updated on: Nov 21, 2025 | 10:04 AM

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. दावोस दौऱ्यावरून भास्कर जाधव यांनी उदय सामंतावर खोचक टीका केली आहे.

ठाकरे गटाते नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर भाष्य केले. दावोस दौऱ्यादरम्यान उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गट्टी जमली असून, उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांची बाजू सावरण्याचा आव आणत असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांना डिवचलंय.

पुढे भास्कर जाधव असेही म्हणाले की, सामंत हे एकनाथ शिंदे यांची बाजू सावरण्याचा आव आणत असले तरी ते फडणवीस यांना कुठेही हानी पोहोचू नये याची काळजी घेत आहेत, असा दावा जाधव यांनी केला. यावर उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांचे हे कौतुक असल्याचे म्हटले. त्यांनी टोला लगावत म्हटले की, जाधव यांना कदाचित पक्षाची बाजू मांडण्याची माझी शैली आवडली असावी.

Published on: Nov 21, 2025 10:02 AM