Santosh Dhuri in BJP : संतोष धुरी हा गद्दार अन् तोडपाणी बादशाह! त्याला कुत्रं तरी विचारतं का? भाजपवासी धुरींवर मनसेचा घणाघात

| Updated on: Jan 08, 2026 | 12:12 PM

संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मनसे नेते मारुती दळवींनी त्यांच्यावर तोडपाणीचा बादशाह आणि गद्दार अशी टीका केली. धुरींच्या भाजप प्रवेशामुळे मनसेला कोणताही फरक पडणार नाही, असे दळवींनी म्हटले. तर ठाकरे गटाच्या सचिन आहेर यांनी धुरींवर भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप केला.

मुंबईतील मनसेचे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून, मनसे नेते मारुती दळवी यांनी धुरींवर गंभीर आरोप केले आहेत. दळवींनी संतोष धुरी यांना तोडपाणीचा बादशाह आणि गद्दार संबोधले आहे. राजसाहेबांनी स्पर्श केल्यामुळे २०० मतांनी निवडून आलेला माणूस असेही दळवींनी म्हटले. धुरींच्या भाजप प्रवेशामुळे मनसेला कोणताही धक्का बसणार नसून, त्यांना त्यांच्या घरातील मतेही मिळणार नाहीत, असा दावा दळवींनी केला. याचवेळी ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनीही संतोष धुरींवर टीका केली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी करणारे धुरी आता भाजपची स्क्रिप्ट वाचत आहेत. निव्वळ एक निवडणुकीची जागा न मिळाल्याने ते पक्षावर टीका करत असल्याचे आहेर यांनी म्हटले. हा घटनाक्रम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.

Published on: Jan 08, 2026 12:12 PM