नराधमानं चिमुकलीला खेळणीचं दाखवलं आमिष, नंतर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली… मुंब्र्यात संतापजनक प्रकार
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे संतापजनक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. १० वर्षाच्या चिमुकलीवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याने चिमुकलीला खिडकीतून खाली फेकून देत तिची हत्या केली.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एक संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंब्र्यात अवघ्या १० वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. नराधम केवळ लैंगिक अत्याचारावरच थांबला नाही तर त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या देखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधमाने चिमुकलीला खेळणी देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर तिला घरात नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. नराधम आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर चिमुकलीला खिडकीतून खाली फेकून दिल्याची माहिती मिळतेय. घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर आरोपी आसिफ अकबर मंसूरी याला अटक करण्यात आली आहे. मुंब्र्यातील ठाकूरपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला इमारतीच्या खिडकीतून उंचावरून फेकून दिले. या चिमुकलीचा मृतदेह आजू-बाजूच्या लोकांना दिसल्याने त्यांनी या घटनेसंदर्भात पोलिसांनी त्वरीत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. १२ तासाच्या आत पोलीस नराधमापर्यंत पोहोचले. चौकशीदरम्यान आरोपीने यासंदर्भात कबुली देत सारा प्रकार सांगितला.
