Sambhaji Raje यांच्या अवमान प्रकरणी मंदिर तहसीलदार, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस

| Updated on: May 13, 2022 | 6:17 PM

तुळजापभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे कालच आले होते, असे नाही तर गेले कित्येक वर्षे ते तुळजाभवानी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. छत्रपती घराण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा संभाजीराजे यांना मंदिरात प्रवेश नाकारल्याने व खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त झाले होते.

Follow us on

उस्मानाबाद: छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थांनाकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडववे गेले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते. तर तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्याप्रकरणी तुळजापूर बंदची (Tuljapur closed tomorrow) हाक देण्यात आली होती. तर जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन, तहसीलदार व व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तुळजापूर शहर बंद राहणार असल्याचे सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) तुळजापूरकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांच्या अवमान प्रकरणी मंदिर तहसीलदार, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.