‘तुम्ही वारसदार मग आम्ही कोण?’, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीनंच उद्धव ठाकरे यांना डिवचलं
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं ठाकरे कुटुंबाच्या सदस्याकडून कौतुक, बघा काय म्हणाले अन् काय लगावला उद्धव ठाकरे यांना टोला
मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच खेडमध्ये जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेच्या आधी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीने जाहीरपणे खोचक टोला लगावला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. स्मिता ठाकरे याच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने महिला दिन विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. नेमकं काय म्हणाल्या स्मिता ठाकरे बघा व्हिडीओ…
Published on: Mar 05, 2023 07:02 PM
